Pathari Bajar samiti Saam tv
महाराष्ट्र

Pathari Bajar samiti : पाथरी कृउबा सभापती अनिल नखातेंचे संचालक पद अपात्र; विभागीय सहनिबंधकाकडे अपील

Parbhani News : पाथरी बाजार समितीची दीड वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी सभापती पदावर अनिल नखाते यांची वर्णी लागली होती

राजेश काटकर

परभणी : साधारण डिड वर्षांपूर्वी निवडणूक झाल्यानंतर परभणीच्या पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्याविरुद्ध दाखल जुन्या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांनी संचालक पद रद्द करण्याचे काढले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

पाथरी (Pathari) बाजार समितीची दीड वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी सभापती पदावर अनिल नखाते यांची वर्णी लागली होती. मात्र काही महिन्यांत राजकीय घडामोडी घडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र नखाते यांनी दुर्राणींना साथ दिली नाही. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. नखाते यांच्यावर दुर्राणी गटाकडून अविश्वास दाखल केला होता मात्र, तो फसला. 

तर नखाते यांनी दुर्राणी गटातील काही संचालक गळाला लावल्याने आणि शिवसेना शिंदे गटाच्या ५ संचालकांच्या सहकार्याने पद राखले. नखाते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच्या जिल्हा उपनिबंधक यांच्याकडील तक्रारीच्या अवहालानुसार नखाते यांना महाराष्ट्र (Bajar Samiti) बाजार समितीच्या नियम २०१७ मधील नियम १० (१) नुसार संचालकपदी अपात्र घोषित केले. नखाते यांचे संचालक पद अपात्र करण्याच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या पदाच्या निर्णयाचा चेंडू त्या कोर्टात गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT