Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : अवकाळी पावसाचा बळी; परभणीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Parbhani News : राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे एकीकडे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राजेश काटकर

परभणी : राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाने काहींचा जीव गेला आहे. दरम्यान (Parbhani) परभणी शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भिंत कोसळून एका इसमाचा (Death) मृत्यू झाला. तर महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. (latest Marathi News)

राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी जोरदार (Rain) पाऊस होत आहे. या पावसामुळे एकीकडे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जोरदार वाऱ्यामुळे देखील घरांचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. शिवाय काही ठिकाणी वीज पडून काहींचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे. यात परभणीत जोरदार वारा व पाऊसामुळे घराची भिंत पडल्याची घटना घडली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नी जखमी 

परभणी शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शहरातील काद्राबाद प्लाट येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय शेरखान यांच्या अंगावर शेजारील घराची भिंत कोळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शेरखान यांची पत्नी देखील जखमी झाली आहे. मयत हा कुटुंबातील कमवता एकमेव सदस्य असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी कुटुंबातील सदस्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा करुणा शर्मा मुंडे यांची याचिका परळीच्या न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT