Parbhani News  Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : मराठा आंदोलनकर्त्यांनी अडविल्या पुढाऱ्यांच्या गाड्या; महाविकास आघाडीच्या संवाद बैठकीदरम्यान घोषणाबाजी

Parbhani News : आरक्षणाला तुमच्या पक्षाचे काय भूमिका? असा प्रश्न सकल मराठा समाजाच्या वतीने विचारला. ५० टक्के आरक्षणाला तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे; ते आम्हाला स्पष्ट सांगा.

राजेश काटकर

परभणी : परभणीच्या पूर्णा येथे महाविकास आघाडीच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Parbhani) या बैठकीला सकल मराठा समाजाच्यावतीने विरोध दर्शवत घोषणाबाजी करून जाब विचारला आहे. तर बैठकीला आलेल्या नेत्यांची गाडी अडवून आरक्षणाबाबत चर्चा देखील केली. (Live Marathi News)

परभणीच्या पूर्णा येथे महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी येथे उपस्थित आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या नेते मंडळी मान्यवरांसोबत माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांची गाडी अडवून यांच्यासोबत चर्चा केली. तसेच आरक्षणाला (Maratha Aarkshan) तुमच्या पक्षाचे काय भूमिका? असा प्रश्न सकल मराठा समाजाच्या वतीने विचारला. ५० टक्के आरक्षणाला तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे; ते आम्हाला स्पष्ट सांगा. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर एसआयटी दाखल झाली सभागृहात तुम्ही तुमच्या पक्षामार्फत भुमिका का नाही मांडली अशी विचारणा देखील केली. तर आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबाची कोणत्याच राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी सातवणपर भेट दिली नाही. या संवाद बैठकीत प्रमुख उपस्थिती परभणीचे खासदार संजय बंडू जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशराव वरपूडकर होती. पण मराठा समाजाचा रोश पाहून बैठकीला आलेच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : न्या. सुर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Tejas Fighter Jet Crash: दुबईमधील शोमध्ये घातपात? एअर शोदरम्यान भारतीय बनावटीचं तेजस MK1 कोसळलं कसं?

Masti 4 vs 120 Bahadur vs De De Pyaar De 2 : रितेश, अजय, फरहान रविवारी कोणाचा चित्रपट हाऊसफुल? '120 बहादूर' ठरतोय वरचढ

Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सैनिकांच्या मुख्यालयाजवळ २ बॉम्बस्फोट अन् गोळीबार; पाहा VIDEO

Cotton buds in ears: कॉटन बड्सने कान टोकारताय? आताच थांबा, अन्यथा बहिरे व्हाल, वाचा डॉक्टरांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT