Parbhani Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Heavy Rain : परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार; शेताला आले नदीचे स्वरूप, होत्याचं नव्हतं झाले

Parbhani News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाहण्यास मिळत आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे

Rajesh Sonwane

विशाल शिंदे
परभणी
: परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने शेताला देखील नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होऊन होत्याचे नव्हते झाले आहे.

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्यांना मोठे पूर आल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुसळधार पावसाचा अधिक फटका शेती पिकांना बसत आहे. हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यात पाहण्यास मिळत असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. 

परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होत्याचं नव्हतं झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्या पिकावर शेतकऱ्यांचे पुढचे नियोजन असते, तेच पीक हातातून गेले आहे. ज्या पिकामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळी- दसरा लेकरा बाळांचे शिक्षण होते. तेच पीक हातातून गेले आहे. यामुळे ऐन दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

पिक घेण्यासाठी शेतकऱ्याने व्याजाने पैसे घेतले होते. मात्र पिकांचे नुकसान झाल्याने व्याजाचे पैसे कसे फेडायचे; असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता फक्त शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा- जरांगेंची मागणी

PMPL News : पुणेकरांसाठी खुशखबर! शहरातील रस्त्यांवर लवकरच धावणार डबल डेकर बस

Nagpur Police Bomb Treat: बॉम्बच्या धमकीनं नागपुरात खळबळ; अटक केली म्हणून पोलीस स्टेशन उडवण्याची धमकी

Ladakh Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय पेटवलं, कुठे घडली घटना?

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी; पीक वाहून गेल्याचे पाहून शेतकऱ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT