Parbhani Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: कार– दुचाकीत भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, लग्नाला जात असलेल्या दोघांचा मृत्‍यू

कार– दुचाकीत भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, लग्नाला जात असलेल्या दोघांचा मृत्‍यू

राजेश काटकर

परभणी : दुचाकीने लग्नाला जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगात येत असलेल्या कारने (Parbhani) जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) दोन युवकांचा मृत्यू झाला. तर इतर चारजण जखमी आहेत. कारच्‍या धडकेत दुचाकीचे देखील दोन तुकडे झाले आहेत. (Live Marathi News)

परभणी गंगाखेड दैठणा शिवारात कार आणि दुचाकीत भीषण अपघात झाल्याची घटना दुपारी साडेबाराच्‍या सुमारास घडली आहे. दैठण्याहून पोखर्णी नृ. येथे दिपक मारोतराव कच्छवे (वय २४) लग्नाला जात होते. दैठण्याजवळ विवेक माणिक नाईक (वय २५, रा. दैठणा) हा भरधाव कारने जात होता. यावेळी समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात दिपक कच्छवे, विवेक नाईक या दोघांचा मृत्यू झाला. पवन कच्छवे आणि इतर तीन जण असे एकूण चौघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी एकाला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

दुचाकीचे दोन तुकडे

भरधाव वेगाने येत असलेली कारने समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. तर अपघातानंतर अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जावून पडली. अपघाताची माहिती मिळाल्यावर सपोनि बालाजी तिप्पलवाड, सपोउपनि बळीराम मुंढे, जमादार फड, मुळे यांनी घटनास्थळी पोहचले. दैठणा येथील दिपक कच्छवे, विवेक नाईक, पवन कच्छवे हे तिघे युवक पोलीस भरतीची तयारी करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

SCROLL FOR NEXT