Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : आठ महिन्यापूर्वी झालेला रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून; मार्गावरील वाहतूक ठप्प

Parbhani News : विदर्भ, मराठवाडा भागात मागील तीन- चार दिवसांपासून पाऊस होत आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस होत आहे

राजेश काटकर

परभणी : दोन दिवस सलग झालेल्या पावसामुळे मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्धक ते सारंगपूर रस्त्यावरील रस्ता वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील प्रवाशांना आता इतर मार्गाने फेरा मारुन मानवतकडे जावे लागत आहे.

विदर्भ, मराठवाडा भागात मागील तीन- चार दिवसांपासून पाऊस होत आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस होत आहे. परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाच्या (Rain) सारी बरसल्या आहे. पहिल्याच पावसात नदी, नाल्यांना पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. मानवत तालुक्यातील सारंगपूर ते रामपुरी या रस्त्यावरील सारंगपूर गावापासून दोन किलोमिटरच्या अंतरावर अंदाजे पंधरा फुट डांबरी रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. 

नव्याने बांधण्यात (Parbhani) आलेला रस्ता वाहून गेला आहे.  हा रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने मंगरुळ, सारंगपूर, वांगी, थार, रामपुरी आदी गावांचे हाल होत आहेत. यामुळे वाहनधारकांना अन्य मार्गाने वाहने काढावी लागत आहेत. यामुळे तात्काळ नवीन पुलाची निर्मिती करावी; अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता आठ महिन्यापूर्वी तयार करण्यात आल्याने ह्याच्या दर्जा विषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: शिवीगाळाचं समर्थन नाही; पण FIR सुद्धा योग्य नाही, अभिजीत दिपके स्पष्ट बोलला

Heart-Brain Health : निरोगी हृदय, तल्लख मेंदू! आजपासूनच करा 'हे' सोपे उपाय, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात लवकरच होणार वाढ, 'या' महत्त्वाच्या तारखा नोट करा

SCROLL FOR NEXT