youth end life for maratha reservation Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: शेतात गेला पण परत आलाच नाही, मराठा आरक्षणासाठी २७ वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Priya More

राजेश काटकर, परभणी

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुणाने आपले जीवन संपवले. परभणीच्या जिंतूर तालुक्यात ही घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी पाचवा बळी आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून टोकाचे पाऊल उचलले. शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परभणीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथील २७ वर्षीय किशोर ससे या तरुणाने सुसाइड नोट लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केली. शेतातील झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. सोमवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. जिंतूर तालुक्यातील हा पाचवा बळी आहे. किशोर ससे हा गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होता. विशेष करून जिंतूर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनात पाचेगाव अग्रस्थानी आहे. अशातच १६ सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसत असल्यामुळे किशोर ससे हा विवंचनेत होता आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

किशोरने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नातेवाईकांना समजताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेतेतील किशोरला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासून किशोरला मृत घोषीत केले. दरम्यान किशोर ससेने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली. 'एक मराठा कोटी मराठा, मी मनोज जरांगे', असे या सुसाइड नोटवर त्याने लिहले होते. या घटनेची नोंद जिंतूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई,वडील,दोन भाऊ असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT