Parbhani Municipal Election 2026 Saam tv
महाराष्ट्र

Municipal Election : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ४० वर्षे जुने मतदार केंद्र बदलले, परभणीकरांमध्ये संताप

Parbhani Municipal Election 2026 : परभणीत चार दशकांपासून सुरु असलेला मतदान केंद्र बदलला असल्याने मतदार संतापले आहेत. सत्ताधारी पक्षाला आमचे मतदान होवू द्यायचे नाहीत असा आरोप उबाठा गटाच्या आमदाराने केला आहे.

Alisha Khedekar

  • १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी निवडणूक

  • परभणीत मतदान केंद्र अचानक बदलले

  • निर्णयावरून मतदार आक्रमक झाले

  • बदलाविरोधात आंदोलन सुरू

विशाल शिंदे, परभणी

राज्यात येत्या १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष जोमाने काम करत आहेत. काही ठिकाणी युतीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी कुणी तिकीट देत का तिकीट असे सूर ऐकायला मिळाले. एबी फॉर्म घोटाळे असोत किंवा मग मतदार यादीतील घोळ हे यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरले. अशातच आता परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १५, १६,१३ यासह इतर प्रभागातील चाळीस वर्षापासून कायम असलेले मतदान केंद्र अचानकपणे बदलण्यात आलेत. चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे मतदान केंद्र देण्यात आल्यामुळे प्रभागातील मतदार आक्रमक झाले आहेत.

मतदार यांद्यांच्या घोटाळ्यानंतर आता चक्क मतदान केंद्र बदलण्याचा घोळ महापालिका प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून घातला गेला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५, १६,१३ यासह इतर प्रभागातील चाळीस वर्षापासून कायम असलेले मतदान केंद्र अचानकपणे बदलण्यात आलेत. चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे मतदान केंद्र देण्यात आल्यामुळे, या प्रभागातील मतदार आक्रमक झालेत.

अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन सुरू केल आहे. तसेच उबाठा शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी ५ दिवसांपूर्वी तक्रार केली. तरीही प्रशासन जुमानत नसल्याने उबाठा शिवसेना आणि काँग्रेसकडून यावर जनआंदोलन केले जाणार आहे.

सत्ताधारी पक्षाला आमचे मतदान होवू द्यायचे नाहीत, असा आरोपही उबाठा आमदार डॉ राहुल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ऐन प्रचाराच्या काळात परभणीत बदललेल्या मतदान केंद्रावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आता कोणाच्या बाजूने निर्णय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT