महाराष्ट्र

परभणीत घडलं भयानक हत्याकांड; तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या, नातेवाईकांचा आक्रोश

parbhani news today : परभणीतून भयानक हत्याकांड समोर आलं आहे. एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

धाराशिवनंतर परभणीत तरुणाची हत्या

तरुणाच्या हत्येनंतर परभणीत खळबळ

तरुणाच्या नातेवाईकांकडून कडक कारवाईची मागणी

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणी : राज्यात हत्येच्या घटना सुरूच असल्याचे समोर येत आहे. धाराशिवनंतर आता परभणीत भयानक हत्याकांड घडलं आहे. परभणीच्या सेलूमध्ये तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना घडली. तरुणाच्या हत्येनंतर परभणी परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. तसेच आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गायत्रीनगर परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री हत्येची गंभीर घटना घडली. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणाच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी डीजे लावलेले चारचाकी वाहन आणि एक दुचाकी जाळून टाकत तोडफोड केली.

विशेष म्हणजे, घटनावेळी परिसरात पोलिस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाताहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह मृतदेह न उचलण्याचा इशारा दिला आहे.

धाराशिवमध्ये ३६ वर्षीय तरुणाची हत्या

धाराशिवच्या तुळजापुरातील मंगरूळमध्ये ३६ वर्षीय युवकाचा डोक्यात दगड आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल ९० फूट फरफटत नेऊन ओढ्याच्या काठावर पळसाच्या झाडाखाली टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मृत युवकाचे नाव कृष्णाथ साठे आहे. कृष्णाथच्या गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील ओढ्याजवळ तो मृतावस्थेत आढळलाय. प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने मृताच्या पत्नीसह सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT