Parbhani News
Parbhani News Saam Tv
महाराष्ट्र

जगात जर्मनी अन् आपल्याकडे परभणी! शेतकऱ्याने मागितलं चक्क साडेसहा कोटींचे कर्ज; कारण ऐकूण व्हाल थक्क

साम टिव्ही ब्युरो

परभणी: "जगात जर्मनी अन् भारतात परभणी" याच म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने बँकेकडे (Bank) एका व्यवसायासाठी कर्ज मागितले. या शेतकऱ्याना बँकेकडे कर्ज तब्बल साडे सहा कोटी रुपये मागितले.

आतापर्यंत शेतकऱ्यांनी (Farmer) शेतीला जोड धंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन एक तर शेळी पालन किंवा दूध व्यवयाय केला आहे. यासाठी काही लाखांचे कर्ज घेतले जाते, पण या शेतकऱ्याने तब्बल साडे सहा कोटींचे कर्जाची मागणी केल्याने बँकेतील अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील बोरी येथील दगडुबा वजीर हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी एका नवीन व्यवसायासाठी बँकेकडे साडे सहा कोटी रुपयांचे कर्ज मागितले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन एक तर शेळी पालन किंवा दूध व्यवयाय केला आहे.

परभणीच्या बोरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने चालवण्यासाठी बँकेकडे साडे कोटींचे कर्ज मागितले आहे. बँकेने कर्ज दिल्यास ते हेलिकॉप्टर खरेदी करून ते भाड्याने देऊन त्यांना तासाला ६५ हजार रुपये मिळतील अशी त्यांना आशा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covishield Vaccine : तुम्हीही Covishield लस घेतली आहे? दुष्परिणामांसह तुमच्या जिवाला किती प्रमाणात धोका, वाचा सविस्तर

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा शिंदे गट लढणार, नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब

Summer Tips: उन्हाळ्यात चक्कर येण्याची समस्या ठरतेय गंभीर, कशी घ्याल काळजी?

IPL 2024 Playoffs: इंग्लंडच्या या एका निर्णयाने IPL च्या ५ संघांचं टेन्शन वाढलं; वाचा कारण

Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास अधिक वेगवान होणार, मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT