Jintur News Saam tv
महाराष्ट्र

Jintur News : पंकजा मुंडे विषयी आक्षेपार्ह पोस्ट; जिंतूरमध्ये कडकडीत बंद

Parbhani News : ओबीसी बांधवांनी एकत्र येत अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून सदर इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या इसमावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राजेश काटकर

परभणी : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. हि पोस्ट टाकणाऱ्या एकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. तसेच याच्या निषेधार्थ आज जिंतूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर अभि तळेकर पाटील या इन्स्टाग्रामवर आयडीवरून अश्लील शब्दात पोस्ट टाकण्यात आल्याचे रविवारी रात्री निदर्शनास आले. या पोस्टमुळे सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधव संताप व्यक्त करत रात्री (Jintur) जिंतूर पोलीस ठाण्यात जमा झाले होते. यानंतर सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येत अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरून सदर इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या इसमावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळपासून कडकडीत बंद 

दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर सकल ओबीसी समाज बांधवांच्यावतीने आज जिंतूर बंदची हाक दिली आहे. त्यानुसार जिंतूरमध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी देखील दुकाने बंद ठेवली आहे. दरम्यान ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचे देखील पाहण्यास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT