Parbhani hingoli news Saam tv
महाराष्ट्र

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Parbhani hingoli : परभणी, हिंगोलीत विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का उतरवला आहे.

Vishal Gangurde

परभणीत शिवसेना विरुद्ध शिवसेना थेट लढत

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक : महायुती-महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन करत भरले अर्ज

परभणीत ७ उमेदवारांचे अर्ज दाखल

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणी, हिंगोलीत विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच रंगलं आहे. महायुती आणि महाविकास बड्या नेत्याच्या उपस्थितीत उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. दुसरीकडे काही नाराज आणि अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याशिवाय काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे पुत्र सुशील देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर आणि नगरसेवक विजय जामकर यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. तसेच मेहेरज खान आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तरी सध्या महायुतीचे सईद खान आणि महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांच्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT