Parbhani Jintur City News  Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: खेळता खेळता विजेच्या खांबाला हात लागला; शॉक लागल्याने ३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

राजेश काटकर

Parbhani Jintur City News

घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत खेळताना ३ वर्षीय चिमुकलीने नकळत विजेच्या खांबाला हात लावला. इलेक्ट्रिक पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे तिला शॉक लागला. कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वाटेतच चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात मंगळवारी (२० फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फरीया अलीम शेख (वय ३०) असं मृत चिमुकलीचं नाव आहे. फरीयाच्या मृत्युने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे फरीयाचा जीव गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी देखील शेख कुटुंबियांनी केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील (Parbhani News) आठवडी बाजार परिसरातील अलीम शेख आपल्या कुटुंबासहित राहतात. मोलमजुरी करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे अलीम हे सकाळी उठून कामावर गेले.

यावेळी फरीया आणि तिची आई दोघेच घरात होते. आई घरकामात व्यस्त असताना फरीया झोपेतून उठून घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत खेळायला गेली. खेळता खेळता तिने नकळत विद्युत खांबास स्पर्श केला. जबर शॉक लागल्याने फरीया जागेवर बेशुद्ध पडली.

परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली असता फरीयाच्या आईने घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT