Shivshahi Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani Shivshahi Bus Accident: दुर्देवी! शिवशाही बसच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ

Parbhani Shivshahi Bus Accident : परभणी शहरांमध्ये वाढत्या अपघातांंमुळे (Accident) नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

Gangappa Pujari

राजेश काटकर, प्रतिनिधी...

Parabhani Accident News: परभणी शहरात शिवशाही बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना बसखाली आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे... (Latest Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी Parabhani) शहरातील स्टेशन रोडवरून हिंगोली - परभणी (MH.09 EM .2293) ही शिवशाही बस स्थानकाकडे जात होती. यावेळी परभणी रेल्वे स्थानकासमोर एक महिला रस्ता ओलांडत असताना या बस खाली आली. या दुर्देवी घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांना गर्दी पांगवत वाहतूक सुरळीत करावी लागली. या दुर्देवी घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे नाव कळाले नसून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया नवा मोंढा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

तसेच परभणी शहरांमध्ये वाढत्या अपघातांंमुळे (Accident) नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. परभणी शहरांमध्ये वाहतुकीचे नियम कोणीच पाळायला तयार नाही त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे सिग्नल व्यवस्था पूर्णपणे बंद आहे तर नागरिक ही वाहतुकीचे नियम पाळत नाहीत.

त्याचबरोबर वाहन चालक ही बेशिस्तपणे वाहन चालवत असल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT