Parbhani Accident Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident : अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी; १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

राजेश काटकर

परभणी : अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन अनेकांच्या जीवावर बेतले आहेत. या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने १८ वर्षीय मुलाचा बाली घेतले आहे. हा वाळूने भरलेला डंपर पलटी झाल्याने दबून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना (Parbhani) परभणी तालुक्यातील अंगलगाव येथे घडली आहे. (Live Marathi News)

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना अंगलगाव- धसाडी या रस्त्यावर घडली आहे. या घटनेमध्ये आकाश मारोती पौळ (वय १७, रा.सिंगणापुर) या मुलाचा मृत्यू झाला. परभणी तालुक्यातील अंगलगाव येथुन धसाडीकडे जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी (Accident) झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. या ट्रकमध्ये आकाश पोले हा मुलगा ट्रकच्या काॅबीनमध्ये बसला होता. ट्रक पलटी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू (Death) झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालक झाला पसार 

सदर घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दैठणा (Police) पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ठल कुकडे, प्रकाश व्हीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष केल जात आहे. परंतु महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवैध रेती वाहतूक सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT