Jintur Bike Accident News Saam TV
महाराष्ट्र

Parbhani Accident News : भरधाव वेगात आले अन् थेट नदीत कोसळले; भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Jintur Accident News : जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नदीवरील चौथा पूलावर भीषण अपघात झाला आहे.

राजेश काटकर

Jintur Bike Accident News : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नदीवरील चौथा पूलावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणारी दुचाकी थेट पुलावरून खाली कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला. (Latest Marathi News)

ही धक्कादायक घटना मंगळवारी (Parbhani News) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. कैलास गौतम मस्के (वय ४० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिंतूर येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास मस्के हे वसमत तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी असून ते छत्रपती संभाजीनगरवरून मित्रासोबत गावाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

चारठाणाजवळ चौथ्या पूल नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलावरून दोघे जात असताना दुचाकीचा वेग जास्त असल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट पुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेत (Accident) दोघेही पुलावरून खाली नदीत कोसळले.

पुलाची उंची २५ ते ३० फूट असल्याने या घटनेत कैलास यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आधार कार्ड वरून कैलास गौतम मस्के हेच असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. चारठाण येथील युवकांच्या मदतीने दोघांनाही नदीच्या बाहेर काढले. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता, यातील कैलास यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT