Parbhani News Saamtv
महाराष्ट्र

Parbhani Accident: परभणीच्या गंगाखेड उड्डाणपुलावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

Accident News Update: अपघातातील दोघांना हि पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Gangappa Pujari

राजेश काटकर, प्रतिनिधी...

Parbhani News: परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. परभणीच्या गंगाखेड उड्डाणपुलावर असलेल्या डिव्हायडरला मोटारसायकल धडकल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शेख अहेमद शेख युसूफ असे या मृत तरुणाचे नाव असून या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Parabhani News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणीच्या गंगाखेडच्या उड्डाणपुलावर एक दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तीनपैंकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शेख अहेमद शेख युसूफ असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तर दुचाकीवरील सय्यद वशिम ताजुद्दीन व शेख अमिर इस्माईल हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील दोघांना हि पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची (Accident) मालिकाच सुरू आहे. आज सकाळीच नंदूरबारमध्येही भीषण अपघाताची घटना समोर आली होती. नंदूरबार जवळच्या प्रकाशा गावाजवळ ट्रक व छोटा हत्ती गाडीत समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीघांचा दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी (ता. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा (Accident) अपघात झाला. (Live Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT