महाविद्यालयाचा गलथान कारभार! पेपर दिला गणिताचा गुण आले जीवशास्त्राचे
महाविद्यालयाचा गलथान कारभार! पेपर दिला गणिताचा गुण आले जीवशास्त्राचे Saam TV
महाराष्ट्र

महाविद्यालयाचा गलथान कारभार! पेपर दिला गणिताचा गुण आले जीवशास्त्राचे

साम टिव्ही ब्युरो

नाशिक: पेपर दिला गणिताचा आणि मार्क्स आले जीवशास्त्र चे असा एक प्रकार नाशिक च्या एका महाविद्यालयाच्या गलथान कारभार मुळे स्नेहल देशमुख बरोबर घडला आहे. तिने याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आणि तिच्या बाजूने निकाल लागत महाविद्यालयाला आपली चुकी सुधरवण्याचे आदेश देत पंचवीस हजाराचा दंड ठोठावला आहे. स्नेहलने बारावीच्या परीक्षेत गणित विषय घेतला होता. तिला पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र तिच्या गुणपत्रिकेत तिला गणिताऐवजी जीवशास्त्र या विषयात गुण देण्यात आले. जीवशास्रामध्ये तिला शंभरापैकी ८४ गुण मिळाले तरीही तिला अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेता आला नाही. याबाबत तिने महाविद्यालयात आणि शिक्षण मंडळाकडे वेळोवेळी अर्ज करून सदर चूक दुरुस्त करण्याची मागणी केली, मात्र या अर्जाकडे कानाडोळा करण्यात आला.

याचा मानसिक त्रास तिला सहन करावा लागत होता, त्यामुळे तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि तिच्या बाजूने निकाल देत मार्कशीट मध्ये सुधारणा करून मार्कशीट देण्यास आदेश दिले त्यावर तिने न्यायालयाचे आभार मानले आहे. हा विद्यालयाने पुरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे विषयांचा गोंधळ झाल्याचे स्नेहलच्या वतीने सांगण्यात आले. महाविद्यालयाने देखील ही चूक मान्य केली आणि चूक दुरुस्त करण्याची तयारी दर्शवली, परंतु मंडळाने याला हरकत घेतली.

मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये महाविद्यालयातून आलेला तपशील अपलोड झाला की तो बदलता येणार नाही, असा निर्णय चालू वर्षी जुलैमध्ये शासकीय अध्यादेशाद्वारे घेण्यात आला आहे. तसेच आता गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे मंडळ या गुणपत्रिकेमध्ये बदल करण्यास असमर्थ आहे, असे मंडळाकडून सांगण्यात आले. त्यावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केला. खंडपीठाने महाविद्यालयाला २५ हजार रुपयांचा दंड सुनावला आणि महाविद्यालयातील कर्मचारी किंवा संबंधितांमुळे विद्यार्थिनीला मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे ही रक्कम विद्यार्थिनीला द्यावी असे आदेश दिले आहेत, यावर स्नेहल ने न्यालायलाचे आभार मानले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT