citizens morcha  saam tv
महाराष्ट्र

Panvel: वाढीव मालमत्ता कर रद्द करा; पनवेल महापालिकेवर नागरिकांचा माेर्चा

यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा नगरसेवक रवींद्र भगत यांनी दिला.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : पनवेल (panvel) महापालिकेने गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची विकासकामे न करता दुपटीपेक्षा अधिक मालमत्ता कराची नोटीस पाठविल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. सेवा नाही तर कर नाही अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज (शुक्रवार) पनवेल महापालिकेवर (panvel muncipal corporation) मोर्चा काढला. (navi mumbai latest marathi news)

महापालिका अस्तित्वात आल्यावर गावांना ग्रामपंचायतीच्या दरानुसार मालमत्ता कर आकारले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत अवाच्यासवा मालमत्ता कर आकारल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई (navi mumbai) ९५ गावे नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला मात्र खारघर पोलिसांनी खारघर मधेच या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेत हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला. यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा नगरसेवक रवींद्र भगत यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT