Panvel Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Panvel Crime : आधी महिलेचा पाठलाग, मग घडलं भयंकर; पनवेलमधील हत्येचं गूढ अखेर उलगडलं

Panvel Crime News: पनवेलमध्ये एका आरोपीनं महिलेचा गळा आवळुन हत्या केली, त्यानंतर महिलेच्या अंगावरून दागिने आणि मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला.

Bhagyashree Kamble

पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पनवेलमध्ये एका आरोपीनं महिलेचा गळा आवळुन हत्या केली, त्यानंतर महिलेच्या अंगावरून दागिने आणि मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला. मध्यप्रदेशला पलायन केलेल्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत विचारपूस केली असता, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पनवेलमध्ये एका व्यक्तीनं चोरीच्या हेतूनं महिलेचा पाठलाग केला. चोरट्यानं महिलेचा हात पकडला. महिलेनं विरोध केला. त्यांनतर आरोपीनं कपड्यानं गळा आवळला, ज्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेची हत्या करुन अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाला होता. घटना निर्जनस्थळी घडल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र, गुन्हे शाखेनं तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आलं.

मध्यप्रदेशमध्ये चोरट्यानं पलायन केलं होतं. नंतर आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी आरोपी शरद साहू याला मुद्देमालासंबंधीत विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर आरोपीनं चोरी केलेला मुद्देमाल परत केला आणि महिलेची गळा आवळून हत्या केल्याचं देखील कबूल केलं.

नेमकी घटना काय घडली?

पनवेलमध्ये हत्या करून चोरी केल्याची घटना घडलीय. शरद साहू या आरोपीनं महिलेचा चोरी करण्याच्या हेतूनं पाठलाग केला. नंतर त्यानं महिलेचा हात पकडला. महिलेने हात झटकला, त्यानंतर चोरट्यानं एका कापडाच्या मदतीनं महिलेचा गळा आवळला. ज्यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. नंतर आरोपीनं महिलेच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झाला. पोलिसांना माहिती मिळताच महिलेचा शोध घेण्यात आला, त्यात चोरट्यानं महिलेची हत्या करून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT