Panvel Court Saam tv
महाराष्ट्र

Panvel Court : न्यायाधीशाच्या बोगस सह्या करुन बनवले वारस दाखले; लिपिकासह दोन वकिलांना अटक

Panvel News : दीपक फड या लिपिकाने चक्क न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या करून त्यावर न्यायालयाचे शिक्के मारून बनावट वारस दाखले तयार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
पनवेल
: बोगस सह्या करून फसवणूक केल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र कोर्टातच न्यायाधीशाच्या बोगस सह्या केल्याचा प्रकार पनवेलमध्ये समोर आला आहे. यात पनवेल येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत असलेल्या लिपिकाने नायाधीशाच्या बोगस सह्या करून वारस दाखले बनविण्यात आले आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे कोर्टात खळबळ उडाली आहे. 

पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड असे न्यायाधीशाच्या बोगस सह्या करणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. दीपक फड या लिपिकाने चक्क न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या करून त्यावर न्यायालयाचे शिक्के मारून बनावट वारस दाखले तयार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

बोगस चलन बनवून लाखोंचा अपहार 

दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसात दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी दीपक फड याला अटक केली. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे देखील उघडकीस आले. यामुळे दिवाणी न्यायालयात खळबळ उडाली आहे. 

दोन वकिलांचाही सहभाग 

न्यायालयातील बोगस सही करणारा लिपिक दीपक फड याने केलेल्या कारनाम्यात दोन वकिलांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी लिपिक दीपक फड यांच्यासह वकील योगेश केळकर आणि अमर पटवर्धन यांना देखील अटक केली आहे. तसेच बोगस वारस दाखल्याच्या आरोपीची यादी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT