Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, किती तुरटी फिरवणार? पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

Maharashtra politics News: मंत्री पकंजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केली आहे. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची?

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे बंधु वारंवार चर्चेत आहेत. मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांच्या कचाट्यात सापडत आहेत. विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना, मंत्री पकंजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केली आहे.

'राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची? काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात', अशा शब्दात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या टीका- टिप्पणीवर खंत व्यक्त केली आहे.

जालना येथे पर्यावरणमंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शिवसेनेच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला होता. यावेळी विरोधकांच्या टीका - टिप्पणीवर खंत व्यक्त केली आहे. तसेच वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'माझे वडील नेहमी मला खुप जीव लावायचे. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला गोपीनाथ मुंडे साहेब दिसतात', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यानंतर कुणीही माझं कौतुक केलं नाही. फक्त जनेतनं केलंय. गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं' असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, 'जात नाही ती जात. पण आम्ही जातीयवादी नाही. जात म्हणजे समाज आणि हाच समाज ज्या हातात द्यायचंय ते हात तयार झाल्याचं लक्षात येताच स्वर्गीय गोपीनथ मुंडे यांनी निवृत्ती घेत असल्याचं बोलून दाखवलं', असं भाषणावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या..

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. यात संबंध आढळला तर, योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर, अन्याय व्हायला नको. हा अजित दादांचा निर्णय असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच तपास यंत्रणा त्याचं काम करीत आहेत. तपास सुरू आहे. यावरच सगळं अवलंबून असल्याचंही देखील त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT