Lok Sabha Election 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : बीडची लोकसभा निवडणूक कोण लढवणार? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं

Beed Lok Sabha : पंकजा मुंडे या बीडची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर पंकजा मुंडे यांना विचारलं असता बीडची लोकसभा नेमकं कोण लढवणार ? हे पक्षातले श्रेष्ठ लोक ठरवतील, असं उत्तर दिलं.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

पंकजा मुंडे या बीडची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर पंकजा मुंडे यांना विचारलं असता बीडची लोकसभा नेमकं कोण लढवणार ? हे पक्षातले श्रेष्ठ लोक ठरवतील. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बीडच्या आष्टी शहरात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले आहेत 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल.

कोणत्याही आरक्षणाचा निवडणुकांवर परिणाम होणार नाही

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर धोकादायक परिणाम होणार नाही,असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे त्याचा आरक्षणाचा मराठा समाजाने विरोध केला आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मराठा समाजाने ठरवावे किती आरक्षण हवं आहे की नाही यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करण टाळलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येणार काळ महिलांचा

राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे, कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT