pankaja munde
pankaja munde  - Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : 'तडजोडीचं राजकारण करणं मला शक्य नाही, कारण...'; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Pankaja Munde News : 'ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले, त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला मुभा नसेल, तर तडजोडीचं राजकारण करणं मला शक्य नाही, असे वक्तव्य पंकज मुंडे यांनी केलं. (Latest Marathi News)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रविवारी वंजारी युवा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात मुंडे यांची मुलाखत झाली. प्रकट मुलाखतीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रश्नांना बेधडक उत्तरे दिले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर पुढच्या दशक भराचे राजकारण कसे बघता, यावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा मी आमदार झाल्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा मी उत्तर दिलं होतं. ज्या निमित्ताने मी राजकारणा आले. ते करण्यासाठी माझ्या मनात अमुक अमुक विचार आहे.

'ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले, त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मुभा नसेल, तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही. प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडायची मला भीती वाटत नाही. मी आता ज्या उंचीवर आहे, त्या उंचीवर येणं साध्या साध्या लोकांना जमत नाही, असे पंकजा मुंडे पुढे बोलल्या.

गोपीनाथ मुंडे यांच्याशी सतत तुलना होते, याबद्दल बोलताना मुंडे म्हणाल्या, ' मला ९५ टक्के तुलना सारखी वाटते. मात्र त्यांचा काळ वेगळा होता. त्यांनी सामान्य कुटुंबातून सुरुवात केली. कर्तुत्ववान माणसांच्या पोटी जन्म घेणं भाग्य आहे. पण त्याचा संघर्ष तीव्र आहे'.

सध्या संधी मिळत नाही, त्यावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ' या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मला संधी न देणारे याचे उत्तर देऊ शकतील'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT