Pankaja Munde News Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde News: पंकजा मुंडे 2024 ची निवडणूक राष्ट्रवादीतून लढणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

पंकजा मुंडे थेट राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने राजयकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरूवात झाली आहे. आज ते बीडमध्ये जाहीर सभा घेणार आहे. धनंजय मुंडेच्या बालेकिल्ल्यात ही सभा होणार असून शरद पवारांनी धनंजय मुंडेसाठी कोणता पर्याय शोधलाय याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात पंकजा मुंडे 2024 ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील असं मोठं विधान राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिवांकडून करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

अजित पवार सत्तेत सहभागी होताना धनंजय मुंडे देखील त्यांच्यासोबत आले. धनंजय मुंडेंना यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यात आलं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना अद्यापही राज्य सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकू येत असतात. आता पंकजा मुंडे थेट राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने राजयकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव नेमकं काय म्हणाले?

"भाजपने राज्यात पक्ष फोडायचं काम केलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काय केलं हे माहित आहे. त्यानंतर त्यांच्या मुलींना देखील त्रास दिला जातोय. त्यामुळे पंकजा मुंडे 2024 ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढतील?", असं मोठं विधान राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव केके वडमारे यांनी केलं आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. आज आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT