Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde Blackmail : पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये तिकिटासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

BJP News: पंकजा मुंडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, असा दावा भाजपचे नेते मोहन जगताप यांनी केला आहे.

विनोद जिरे

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये लॉबी करून तिकिटासाठी पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. परळीतील परळीतील पराभवांची भीती दाखवली, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचेही संकेत दिले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा माझा निर्धार झालाय. पक्ष, झेंडा कोणता हे तुम्हाला येत्या पाच तारखेला सांगतो, अशी रोखठोक भूमिका मोहन जगताप यांनी जाहीर करत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. बीडच्या माजलगावमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोहन जगताप म्हणाले की, आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं चांगलं सुरु असताना अजित दादाला घेतलं. त्यामुळे निष्ठावान लोकांची अडचण झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करून माजलगाव मतदारसंघात दुसऱ्यांनीच उमेदवारी मिळवली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाच परंतु माजलगावमधून भाजपा कडून जे उभे होते, त्यांचाही पराभव झाला. आता मात्र यावेळी मी माघार घेणार नाही. निवडणूक लढवणारच असल्याचे देखील मोहन जगताप यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकाश सोळंके यांच्यावरही टीकास्त्र सोडले. आमदार हे बाहेरचे गुत्तेदार आणून टक्केवारी घेत आहेत. स्थानिकांना काम देत नाहीत, विकास कामात माजलगाव मतदारसंघ मागे पडलाय. माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. परंतु मी जर त्यांच्या वैयक्तिक टीका करायला लागलो, तर त्यांना रस्त्यावर चालले मुश्किल होईल, असे देखील मोहन जगताप यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

पालखी सोहळ्यामुळे पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; 10 ते 15 जुलैदरम्यान ‘या’ रस्त्यांवर पूर्ण बंद

SCROLL FOR NEXT