Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : बीड लोकसभेचा उमेदवार ठरला? पंकजा मुंडे यांनी दिले महत्वाचे संकेत

Pankaja Munde Latest News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

विनोद जिरे

Pankaja Munde Latest News :

महायुतीचा राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीचे लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, त्याआधीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उमेदवारीचे संकेत दिले आहेत. (Latest Marathi News)

बीडच्या शिरुर येथे आज सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी प्रीतम मुंडे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, बाळासाहेब अजबे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ? असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'मला कोणी माझी केलं ? हे आता सांगता पण येत नाही. कारण सगळेच एकत्र आले आहेत. पण जेव्हा माझ्यावर मालमत्तेवर धाड पडली, तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ११ कोटी रुपये जमा केले, हे माझं लोकांच्या हृदयाशी जोडलेलं नातं आहे, असे ते म्हणाले.

'सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेलं असून काही वेळ हे इंजिन एकमेकांना भिडले होते. मात्र आता ते बरोबर रुळावर चालत आहेत, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT