panhala girl injured in msrtc bus  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : पन्हाळ्यातील धक्कादायक घटना... पत्रा सरकताच विद्यार्थिनी थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली

हा अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षक, जीवन खवरे, विकास खोत, शिक्षिका दिपाली मोरे य़ांनी शुभश्री पाटील हिला पन्हाळा रुग्णालयात दाखल केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

गेल्या काही महिन्यांपूर्वी बसचा टपावरील पत्रा उघडा असताना ही प्रवास करणाऱ्या एसटीचा (msrtc) व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा मुद्दा थेट विधानसभेत पोहोचला होता. यावरून राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. असाच धक्कादायक प्रकार पन्हाळा (panhala) तालुक्यातील असुर्ले पोर्ले येथील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत घडला आहे. बसमध्येच घडलेल्या अपघातात विद्यार्थिनी जखमी झाली. (Maharashtra News)

एसटी महामंडळाची बस पन्हाळ्याहून असुर्ले पोर्ले दरम्यान धावत होती. दरम्यान आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्लेची विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील ही पन्हाळ्याहून या बसमध्ये शाळेला येण्याच्या निमित्ताने प्रवास करत होती. दरम्यान एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर स्टॉप घेत असताना अचानक या विद्यार्थीनीच्या पायाखालील एसटीचा पत्रा सरकला आणि ती थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली.

आज सकाळी दहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. शुभश्री लहू पाटील (वय 14 राहणार उत्तुरे) या गावातील विद्यार्थिनी यात जखमी झाली. तिच्या गुडघ्याला जबर मार लागला आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षक, जीवन खवरे, विकास खोत, शिक्षिका दिपाली मोरे य़ांनी तिला तातडीने पन्हाळा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सूरु आहे. एसटी महामंडळचा कारभारावरही अनेक सवाल केले जात आहेत. बसचा प्रवास प्रवाशांसाठी सुरक्षीत आहे का ? असा सवाल केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार म्हणाला जय गुजरात, हा गद्दार रुकेगा नही साला - उद्धव ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT