Shahaji Bapu Patil Saam tv
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil : तर राजकारणातून निवृत्ती घेणार; शहाजी बापू पाटील यांचे मोठे वक्तव्य

Pandharpur News : सांगोला येथे प्रथमच शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

भारत नागणे

पंढरपूर : येत्या सहा महिन्यांमध्ये सांगोल्याच्या दुष्काळी भागात शेतीसाठी पाणी न आणल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन; असं मोठं वक्तव्य सांगोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूकीत शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा पराभव झाला आहे. निवडणूक पार पडल्यानंतर सांगोला येथे प्रथमच शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना राजकीय निवृत्ती विषयी मोठे वक्तव्य केले आहे. 

शहाजीबापू पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला (Sangola) तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणूकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय निवृत्ती घेईन, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT