Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : चंद्रभागा स्नानासाठी नदीत उतरलेला तरुण बुडाला; जळगावहून दोघे मित्र गेले होते विठ्ठल दर्शनाला

Pandharpur News : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी गावचा रहिवासी दर्शन नारायण कोलते असं बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान दर्शन कोलते व त्याचा एक मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी गेले होते

भारत नागणे

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागा नदीत भाविक स्नान करतात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून दोघे मित्र दर्शनासाठी गेले असताना चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले असता एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. बुडालेल्या तरुणाचा शोध घेणे सुरु आहे. 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी गावचा रहिवासी दर्शन नारायण कोलते (वय १८) असं बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान दर्शन कोलते व त्याचा एक मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी गेले होते. पंढरपूरमध्ये पोह्चल्यानंतर दर्शन आणि त्याचा मित्र सकाळी चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेले होते. येथील भक्त पुंडलिक मंदिर जवळ ते नदीत उतरले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दर्शन व त्याचा मित्र दोघे बुडाले. 

एकाला वाचविण्यात यश 

दोघेजण बुडत असल्याचे नदीत असलेल्या भाविकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच मदत करत एकाला बाहेर काढत वाचवले. मात्र दर्शन कोलते हा तरूण पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस प्रशासन व बचाव पथक येथे दाखल झाले असून त्यांच्याकडून बुडलेल्या तरूणाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सलग सुट्ट्यांमुळे पंढरीत भाविकांची मोठी गर्दी 

सलग सुट्ट्या असल्यामुळे पंढरीत भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज रविवार असल्याने सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागतो आहे/ तर मुखदर्शनासाठी काही तासांचा कालावधी लागतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप मनोमिलन

Sydney Mass Shooting: हातात बंदुक, कंबरेला काडतुसांचा पट्टा; बॉन्डी बीचवर गोळीबार करणाऱ्या एका हल्लेखोराचा फोटो आला समोर

Monday Horoscope: जोडीदारासोबत संबंध सुधारतील, ४ राशींना कामामध्ये यश मिळण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Lionel Messi: जगप्रसिद्ध फुटबॉलपूट लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT