Vitthal Rukmini Mandir Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir : पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा संपली; २ जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, मंदिराचे मूळ रूप समोर

Pandharpur News : मंदिर संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे

भारत नागणे

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरचे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर आता भाविकांना मूळ रूपात पाहता येणार आहे. विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले असून येत्या २ जूनपासून भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.  

पंढरपूरचे (Pandharpur) विठ्ठल- रुक्मिणी मंदिर हे सातशे वर्षांपूर्वीचे जुने असून त्याकडे पुरातन ठेवा म्हणून पाहिले जाते. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे  त्या अंतर्गत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिरातील बहुतांश काम हे आता पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील येत्या काही काळामध्ये पूर्ण होणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास अडीच महिन्यानंतर पुन्हा भक्त आणि देव यांची भेट होणार असल्याने भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

पहाटे नित्य पूजा होऊन पदस्पर्श दर्शनाला सुरवात 

मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धन कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठल- रुक्मिणीचे (Vitthal Rukhamini Mandir) पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता २ जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. २ जून रोजी पहाटे चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते विठुरायाची नित्य पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT