Pandhrpur Ashadhi Yatra Saam tv
महाराष्ट्र

Pandhrpur Ashadhi Yatra : प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन बंद; पंढरपूर आषाढी यात्रेची सांगता

Pandharpur News : आषाढी यात्रा असल्याने पंढरपूरमध्ये देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदा १० ते १२ लाखापेक्षा अधिक भाविक आषाढीनिमित्ताने पंढरपूरमध्ये होते.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. लाखो भाविकांनी पंढरपुरात येऊन विठू माउलीचे दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी २४ तास दर्शनाची सुविधा करण्यात आली होती. दरम्यान प्रक्षाळ पूजेने आज आषाढीची सांगता होत असून याच दरम्यान आजपासून देवाचे २४ तास पदस्पर्श दर्शन बंद होणार आहे.

आषाढी यात्रा असल्याने पंढरपूरमध्ये (Pandharpur) देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदा १० ते १२ लाखापेक्षा अधिक भाविक आषाढीनिमित्ताने पंढरपूरमध्ये होते. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन (Vitthal Rukmini Mandir) घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या निमित्ताने ७ जुलैपासून २४ तास दर्शन सुरू केले  होते. सलग १८ दिवस विठ्ठल आपल्या भक्तांना २४ तास दर्शनासाठी उभा होता. देवाचा थकवा दूर करण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते. यानंतर आषाढीची सांगता करण्यात येत असते. 

प्रक्षाळ पूजेत आज दुपारी १२ वाजता देवाला पहिले स्नान घातले जाईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता दुसरे स्नान घालण्यात येते. या दरम्यान दिवसभर देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून थकवा कमी केला जातो. तर रात्री विविध वनस्पतींचा काढा दाखवला जातो. प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने आज विविध फुलांची सजावट केली आहे. हि प्रक्षाळ पूजा पूर्ण झाल्यानंतर आषाढी यात्रेचा समारोप करण्यात येत असून भाविकांसाठी खुले करण्यात आलेले २४ तास दर्शन देखील आजपासून बंद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT