Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: विठ्ठल दर्शनासाठी व्‍हीआयपी शुल्‍क; वारकरी सांप्रदायाने केली मागणी

विठ्ठल दर्शनासाठी व्‍हीआयपी शुल्‍क; वारकरी सांप्रदायाने केली मागणी

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी वेगवेगळ्या भागातून भाविक येत असतात. यामुळे नेहमीच गर्दी असते. यात आषाढीच्‍या (Aashadhi Wari) वेळी अधिक गर्दी असल्‍याने लवकर व चांगले दर्शन होण्यासाठी (Pandharpur) व्‍हीआयपी दर्शनाची सोय असते. याकरीता व्हीआयपी दर्शनाला शुल्क आकारण्याची मागणी वारकरी सांप्रदायाने केली आहे. (Maharashatra News)

पंढरपूरात विठ्ठल– रूख्‍मीणीच्‍या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. आषाढी यात्रेदरम्‍यान तर भाविकांचा जनसागरच लोटलेला असतो. यामुळे रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत असते. अशात गर्दीत लोटालोट होत असते. या गर्दीत न जाता (Vitthal Temple) विठ्ठलाचे दर्शन चांगल्‍या प्रकारे करता यावे; याकरीता व्‍हीआयपी रांगेची सुविधा आहे. परंतु, या रांगेतील भाविकाला व्‍हीआयपी दर्शनासाठी शुल्‍क आकारावे; अशी मागणी होत आहे.

मंदिराच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी..

व्‍हीआयपी दर्शनासाठीचे शुल्‍क हे मंदिराच्या उत्पन्न वाढीसाठी आकारावे, अशी वारकरी सांप्रदायाने केलेली प्रमुख मागणी आहे. व्हीआयपी दर्शनाला शुल्क सुरू झाल्यास कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असून या शुल्‍कातील रक्‍कमेतून भाविकांना सुविधा देण्याकडे मंदिर प्रशासनाचा कल असावा. व्हीआयपी सशुल्क दर्शनाबाबत वारकरी सेवा संघाच्या हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा जोगदंड महाराजांनी म्‍हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT