Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठुरायाच्या दानपेटीत साडेतीन कोटी; माघी यात्रेत लाखो भाविकांकडून दान

Pandharpur News : पंढरपूरच्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी यात्रेसाठी यंदा तीन ते चार लाख भाविक पंढरपूरमध्ये आले होते.

भारत नागणे

पंढरपूर : नुकत्याच संपन्न झालेल्या माघी यात्रेनिमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या (Pandharpur) दर्शनासाठी दाखल झाले होते. या भाविकांकडून विठुरायाच्या दानपेटीत ३ कोटी ५० लाख रूपयांचे दान टाकण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देणगीमध्ये २३ लाखांनी वाढ झाली आहे. (Breaking Marathi News)

पंढरपूरच्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी यात्रेसाठी यंदा तीन ते चार लाख भाविक पंढरपूरमध्ये आले होते. या यात्रे दरम्यान भाविकांनी विठुरायाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. यामध्ये देवाच्या चरणावर सर्वाधिक २३ लाख ९९ हजार रूपयांचे दान अर्पण केले आहे. तर लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला तब्बल ३९ लाख ४४ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. साधारण (Vithal Tempale) विठुरायाच्या मंदिर दानपेटीत साडेतीन कोटीचे दान आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा देणगीत वाढ 

पंढरपूमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात दान केले जात असते. माघी यात्रेत आलेल्या भाविकांकडून देण्यात आलेले दान हे मागील वर्षीच्या तुलनेत २३ लाखाने जास्त आले आहे. यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही विठुरायाच्या देणगीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT