Pandhapur Politics Saam tv
महाराष्ट्र

Pandhapur Politics : शरद पवार गटाच्या आमदाराचे मंत्री गोगवलेंसाठी स्वागत बॅनर; पंढरपुरातील बॅनरबाजीने राजकीय चर्चांना उधाण

Pandharpur News : पंढरपूरच्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात केलेली बॅनरबाजी चर्चेत आली आहे. त्यांच्या या बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे

भारत नागणे

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. असे असताना आता त्यांच्याच पक्षाच्या पंढरपुरातील आमदाराने शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहे. पंढरपुरातील या बॅनरमुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.

पंढरपूरच्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात केलेली बॅनरबाजी चर्चेत आली आहे. त्यांच्या या बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर पंढरपुरात झळकू लागले आहेत. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लावले आहेत.

आमदार राजू खरे हे शिवसैनिक 

आमदार राजू खरे हे शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आले असले तरी ते मूळचे शिवसैनिक आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ते निवडून आले. निवडून आल्यानंतर मात्र त्यांची शिवसेना शिंदे गटाशी जवळीक अधिक वाढल्याचे वेळोवेळी दिसून आहे. आमदार खरे यांनी पूर्वी देखील जाहीर भाषणामध्ये मी नावाला तुतारीवाला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे नेते आहेत अशी जाहीर राजकीय कबुली दिली आहे. 

पंढरपुरात राजकीय तर्कवितर्क 

आता रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताची बॅनरबाजी त्यांनी केली असून ती चर्चेत आली आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे उद्या पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर त्यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर लावले आहेत. विरोधी पक्षातील आमदाराने मंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT