Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : शासन आपल्या दारी कार्यक्रम आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच; पंढरपुरात मराठा समाजाचा इशारा

Pandharpur News : शासन आपल्या दारी आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच; पंढरपुरात मराठा समाजाचा इशारा

भारत नागणे

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटलं आहेत. (Pandharpur) पंढरपुरात देखील मराठा समाज (Maratha Reservation) आक्रमक झाला असून येत्या १० तारखेला आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला तर उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी देखील केली आहे. (Breaking Marathi News)

जालना येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. अन्यथा पंढरपुरात होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

रास्ता रोको आंदोलन 
जालना येथील घटनेचे पडसाद आज पंढरपुरात उमटले. यात पंढरपूर तालुक्यातील भोसे या ठिकाणी टेंभुर्णी, नगर, पुणे रस्ता अडवून सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने गाई गुरांसह महिला आणि पुरुष येऊन शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावू. असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे पंढरपूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर आता संकट येऊन ठेपले असल्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT