Ujani Dam Saam tv
महाराष्ट्र

Yuva Sena Rasta Roko : उजनी धरणात पाणी सोडा; युवासेनेचा सोलापूर- पुणे महामार्गावर रास्तारोको

Pandharpur News : उजनी धरण मायनस गेले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावे लागणार आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पुणे जिल्ह्यातील धरणातून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात १० टीएमसी पाणी सोडावे; (Pandharpur) या मागणीसाठी युवा सेनेच्यावतीने आज सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. (Maharashtra News)

उजनी धरण (Ujani Dam) मायनस गेले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावे लागणार आहे. शिवाय शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. पाणी टंचाई कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील धरणातून १० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांनी केली आहे. याबाबत अद्याप निर्णय घेतला जात नसल्याने युवा सेनेने आंदोलन छेडले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा 

दरम्यान सोलापूर- पुणे महामार्गावर आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले असून सरकारने पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल; असा इशारा ही यावेळी आंदोलक शेतकर्यांनी दिला आहे. रास्तारोको आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT