Dhairyasheel Mohite Patil Saam tv
महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : चुकीची माहिती दिल्याने भाजप नेते उमेदवारी देताना चुकले; धैर्यशील मोहिते पाटील

Pandharpur Madha News : माढा आणि सोलापूर मतदार संघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे

भारत नागणे

पंढरपूर : भाजपच्या नेत्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघात उमेदवारी देताना भाजप नेते चुकले. त्यामुळे दोन्ही मतदार संघात त्यांचा पराभव झाला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माढ्यातील विजयी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. 

लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया आज पार पडली. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारत महायुतीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळविला आहे. यात माढा आणि सोलापूर मतदार संघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदार संघातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत. विजयानंतर त्यांनी 'साम'शी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न 

धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले कि जनतेने माझी निवडणूक हातात घेतली होती. यामुळेच विजय झाला. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. माणचे भाजप आमदार शेखर गोरे, पराभूत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि श्रीकांत भारती यांनी देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देवून अडचणीत आणले आहे. आता मतदार संघातील केळी, पाणी, डाळिंब, बेरोजगारी आदी प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचेही मोहिते पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : "बाबा हॉस्टेलमध्ये मला... " कोचिंग क्लासमध्ये १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

आम्ही मविआचा भाग नाहीत, राज-उद्धव यांची युती फिसकटली? मनसे नेत्याच्या भूमिकेनंतर चर्चांणा उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये अजित पवारांंच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेत राडा

Chapati Tips: थंडी विसरा! पिठात मिसळा 'हे' 3 पदार्थ, वाढेल रोगप्रतिकारकशक्ती...

SCROLL FOR NEXT