पंढरपूर : यंदा तीव्र उन्हाळा आणि प्रचंड उष्णतेचा परिणाम पंढरपूरच्या चौत्री यात्रेवर झाल्याचे पहावयास मिळत आहे. या यात्रेला (Pandharpur) देखील मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. मात्र यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आलेल्या भाविकांची संख्या कमी आहे. तरी देखील दर्शन रांग एक किलोमीटर लांब गेली आहे. (Latest Marathi News)
प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेली चैत्री (Ekadashi) एकादशीचा सोहळा उद्या पंढरपूरमध्ये मोठ्या भक्ती भावाने साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. (Vitthal Mandir) विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. दरम्यान यावर्षी कडक उन्हाळा आणि तीव्र उष्णतेमुळे भाविकांची संख्या कमालीची घटल्याचे चित्र दिसत आहे. या अनुषंगाने मंदिर समितीने येणाऱ्या भाविकांसाठी टेंट उभारले आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची, चहा नाश्त्याची सोय केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या (Solapur) सोलापूर जिल्ह्यामध्ये ४२ ते ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. त्यातच तीव्र पाणीटंचाई आणि कडक उन्हाळ्यामुळे उष्णतेचे प्रमाण देखील वाढले आहे. याचा परिणाम म्हणून यंदाच्या चैत्र यात्रेत भाविकांची संख्या घटल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी चैत्री यात्रेच्या निमित्ताने पंढरीत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सध्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार नाही. मात्र मुखदर्शनसाठी मोठी रांग लागल्याचेही आपल्याला दिसून येत आहे.
पंढरपुरातील बाजारपेठेवर परिणाम
यंदाच्या चैत्री यात्रेवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी पंढरपुरातील बाजार पेठेवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. भाविकांची गर्दी कमी असल्याने विविध प्रासादिक वस्तू विक्रीची दुकाने ग्राहकाविना ओस पडली आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढाल देखील ठप्प झाली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.