Shahajibapu Patil on Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Shahajibapu Patil on Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली.

Satish Daud

भरत नागणे, साम टीव्ही

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात चांगलाच वाद रंगला आहे. एकनाथ शिंदे गटाशी संबंधित 'मला काहीतरी सांगायचंय' हे नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. या नाटकामार्फेत शिवसेना फुटीची कथा दाखवण्यात येणार आहे. याला उत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाने "५० खोके एकदम ओके" हे नाटक रंगमंचावर आणण्याची तयारी सुरु केली आहे. यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) आज शुक्रवारी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "५० खोके एकदम ओके" या नाटकावर टीका करताना शहाजीबापू म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवावा सांगावे की पन्नास खोके दिले. मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो. ‌ असे थेट आव्हान शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे यांना दिले आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती राज्याचे व्हिजन याबाबत काही सांगण्याची गरज नाही. राज्यातील सर्व जनतेला त्यांच्या कामाबद्दल माहिती आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे निवडणुकीच्या तोंडावर फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. जनमत बनवण्यासाठी ते काही नाटके करत असतील", असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत"

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस नेत्यांकडून आम्ही मोठा भाऊ असा वारंवार उल्लेख केला जात आहे. इतकंच नाही, तर पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार, असा दावा देखील नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात करीत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करा, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. यावर देखील आमदार शहाजीबापू पाटील यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ येईल की ते म्हणतील आम्हाला एक पण जागा नको पण मला मुख्यमंत्रीपद द्या. पण ते काही मुख्यमंत्री होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं देखील शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानाला आता ठाकरे गट नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT