Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : गुढीपाडवानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी; एक किलोमीटर अंतरापर्यंत रांग

Pandhapur News : सध्या विठ्ठल मंदिराचे संवर्धन आणि जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. त्यामुळे भाविकांना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. तरी ही नवीन मराठी वर्षाची सुरुवात विठ्ठल दर्शनाने व्हावी; या भावनेतुन हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत

भारत नागणे

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक नेहमीच आतुर असतात. यात आज मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या निमित्ताने (Pandharpur) पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पदस्पर्श दर्शन बंद असले तरी देखील मुख दर्शनासाठी भाविक पंढरपुरात आले आहेत. (Breaking Marathi News)

सध्या विठ्ठल मंदिराचे संवर्धन आणि जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. (Vitthal Mandir) त्यामुळे भाविकांना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. तरी ही नवीन मराठी वर्षाची सुरुवात विठ्ठल दर्शनाने व्हावी; या भावनेतुन हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. (Gudi Padwa) गुढीपाडव्याला शासकीय सुटी असल्याने अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मुख दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर गेली आहे. अजूनही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच असून भाविकांच्या गर्दीने मंदिर व परिसर फुलून गेला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साखर, खोबरा वाटीचा हार 

मराठी नववर्षानिमित्त भाविकांना सावळ्या विठुरायाचे लांबून का होईना दर्शन घेवून नव वर्षाचा संकल्प करतील. यासाठी मंदिर समितीची देखील तयारी झाली असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने विठुरायाला आज साखरेचा आणि खोबऱ्याच्या वाटीचा हार परिधान करण्यात आला आहे. त्यामुळे देवाचे सोज्वळ रूप अधिकच खुलून दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील डबल डेकर पूल आजपासून खुला

Kokan M2M Ferries : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या M2M फेरीला आणखी दोन ठिकाणी थांबा मिळणार; जाणून घ्या

Iran- Israel War: इराणचे खुर्रमशहर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँच, इस्राइलला भरली धडकी

Vitamin B12 Tablets: व्हिटॅमिन B12च्या गोळ्या घेताय? मग वेळीच सावध व्हा! अन्यथा किडनीचं होईल नुकसान, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Crime News : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; अश्लील मेसेज पाठवायचा अन्...

SCROLL FOR NEXT