Pandharpur Vitthal Temple Saam tv
महाराष्ट्र

विठ्ठल मंदिराचा सात मजली दर्शन मंडप पाडणार; बालाजी देवस्थानप्रमाणे विठुरायाची दर्शन रांग

विठ्ठल मंदिराचा सात मजली दर्शन मंडप पाडणार; बालाजी देवस्थानप्रमाणे विठुरायाची दर्शन रांग

भरत नागणे

पंढरपूर : विठ्ठल मंदिरा शेजारी उभारण्यात आलेला सात मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार आहे. त्यानंतर आता तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) धर्तीवर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श (Pandharpur) दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. (Pandharpur Vitthal Temple)

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बालाजी देवस्थानची आणि तेथील दर्शनरांगेची पाहणी करण्यासाठी गेले आहे. बालाजी देवस्थानप्रमाणे येथील दर्शन रांगेची व्यवस्था करण्याचा विचार सुरु आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी (Vitthal Temple) देशभरातून दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात. येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत येथील दर्शन व्यवस्था अपुरी आहे. जलद आणि सुलभपणे विठुरायाचे दर्शन व्हावे; यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे.

पार्किंग, अग्नीशमनची सुविधा

गेल्या 35 वर्षापूर्वी मंदिराजवळ उभारण्यात आलेला दर्शन मंडपही आता निरुपयोगी ठरला आहे. तो मंडप आता पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पार्किंग, अग्नीशमन आणि मंदीर समितीचे कार्यालय उभारण्य़ात येणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक बालाजी देवस्थनाच्या भेटीसाठी गेले आहे. तेथील दर्शन व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पंढरपुरातही तशी दर्शन व्यवस्था राबवण्याचा विचार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

SCROLL FOR NEXT