Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

Pandharpur News : घटना अत्यंत चुकीची असून चौकशी सुरू केली आहे. कंपनीला नोटीस दिली जाणार आहे. योग्य खुलासा आला नाही तर कंपनीवर कारवाई केली जाणार असल्याचे मंदिर समितीच्या सदस्या अॅड माधवी निगडे यांनी सांगितले

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांच्या भावनेशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून विक्री करण्याचा हा गोरख धंदा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मंदिर समितीकडे काम करताना या खासगी सुरक्षा रक्षकाचा तीर्थ विक्रीचा धंदा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला असून हा व्हीडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.

वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये आलेले भाविक चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून मोठ्या श्रद्धेने प्रशासन करतात. मात्र पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक लूट केली जाऊ लागल्याच्या या प्रकारातून समोर आले आहे. ही लूट मंदिर समितीकडे सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच करावी ही बाब त्याहून वाईट मानली जात आहे.

तीर्थ म्हणून विकले पाणी 

सध्या चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. शिवाय या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून बिव्हीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र येथे नेमलेले सुरक्षारक्षकच नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे, तर याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

बीव्हीजीची सुरक्षा वादात 
बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकाचा ठेका मिळाल्यापासून ही कंपनी सतत कोणत्या ना कारणावरून चर्चेत आहे. तीर्थ म्हणून चंद्रभागेचे पाणी विक्री केल्याने पुन्हा एकदा सुरक्षा कंपनी वादात अडकली आहे. यापूर्वी याच कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. आषाढी वारी काळात सुरक्षा कर्मचाऱ्याने वशिल्याचे दर्शन दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता याच कंपनीच्या सुरक्षा कर्मचार्याने तीर्थ म्हणून पाणी विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर-धाराशिव, बीडमध्ये पूरस्थिती, पावसामुळे हाहाकार

पावसाचं रौद्ररूप! संसार उघड्यावर, गावं पुराच्या विळख्यात; सोलापूरसह ३ जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

Success Story: आईपण भारी देवा! शिक्षक झाल्या, ८ महिन्याच्या मुलाला सांभाळत केली UPSCची तयारी; IAS मोनिका रानी यांचा प्रवास

Uddhav-Raj Thackeray: शिवसेना- मनसे एकत्र येणार? महापालिकेसाठी ठाकरे सेनेचा मविआला रामराम? वाचा स्पेशल रिपोर्ट

Shani Budh Yuti: दिवाळीनंतर बनणार नवपंचम राजयोग; वर्षाच्या अखेरीस 3 राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

SCROLL FOR NEXT