Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपुरात 'छोरीया' कंपनीत फसवणूक प्रकरणी १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Pandharpur News : जमिनीचे संगनमताने, कट रचून बनावट नोटरी साठेखत, कब्जा पावती व कुलमुखत्यार असे दस्त तयार करून फसवणूक केली. तसेच ९ कोटी रूपयांची मागणी केल्याप्रकरणी १३ भूमाफिया विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध २० कलमान्वये गुन्हा

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर जवळच्या वाखरीतील 'छोरीया प्रॉपर्टीज डेव्हलपमेंट कंपनी'ने खरेदी व विकसीत केलेल्या जमिनीचे संगनमताने, कट रचून बनावट नोटरी साठेखत, कब्जा पावती व कुलमुखत्यार असे दस्त तयार करून फसवणूक केली. तसेच ९ कोटी रूपयांची मागणी केल्याप्रकरणी अखेर (Solapur) सोलापूर व पुणे जिल्ह्यातील १३ भूमाफिया विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध २० कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाच्या (Pandharpur) आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे पुणे येथील भागीदार कन्हैयालाल जैन यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. (Breaking marathi News)

'छोरीया प्रॉपर्टीचे मालक जैन यांनी वाखरी हद्दीतील २१ हेक्टर जमीन सन २००७ मध्ये अनंता कैकाडी व राजकुमार कैकाडी, भामाबाई जाधव, पद्मीनी कैकाडी आदींच्या संमतीने खरेदी केली. तसेच ही जमीन बिनशेती करून विकसीत केली आहे. नंतर येथे बांधकाम सुरू करून रेरामध्येही नोंदणी केली आहे. (Fraud) असे असताना सन २०१३ मध्ये अनंता कैकाडी, सागर कैकाडी व राजकुमार कैकाडी यांनी नजीर कोरबू याला सदर मिळकतीबाबत साठेखताचा दस्त करून दिला. राम भाग्यवंत याच्याकडून कुलमुखत्यार पत्राचा दस्त नोटरी करून घेतला. तसेच राजकुमार कैकाडी याने दुर्गाप्पा वाघमोडे व मे.जानकी एंटरप्रायझेस तर्फे सोमनाथ माळी याला साठेखताचा दस्त नोटरी करून दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील संशयित आरोपींनी कट रचून, फसवणूक व खंडणीच्या उद्देशाने बनावट नोटरी साठेखत, कब्जा पावती व कुलमुखत्यार असे दस्त तयार केले. वकिलांच्या मदतीने त्याआधारे न्यायालयात खोटे दावे दाखल केले. खोटे पुरावे निर्माण करून ते खरे असल्याचे भासवले. याप्रकरणी धमकी देत ९ कोटींची मागणी करण्यात आली. तसेच पिस्तुल, कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकून ६५ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. कंपनीचे २५ ते ३५ लाखांचे नुकसान केले. यातील संशयित आरोपी सराईत असून संघटित गुन्हेगारी करीत आहेेत; अशा आशयाची खासगी फिर्याद कन्हैय्यालाल जैन यांनी येथील न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT