Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Pandharpur News : कामगारांना कास पठार पाहण्यासाठी शहा हे कर घेऊन निघाले असताना पहाटेच हा भीषण अपघात झाला

भारत नागणे

पंढरपूर : कास पठार पाहण्याच्या निमित्ताने फिरण्यासाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील कारूंडे गावाजवळ कार आणि टेम्पोचा समोसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये चार‌ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

लासुर्णे येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना फिरण्याच्या निमित्ताने कारमधून साताराकडे निघाले होते. सर्व कामगारांना कास पठार पाहण्यासाठी शहा हे कार घेऊन निघाले असताना पहाटेच हा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार (Accident) धडक झाली. यात कारचा समोरचा भाग संपूर्णपणे दाबला गेला आहे. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिक लागलीच मदतीला धावले. 

चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर 

या भीषण अपघातामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेश शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेले इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील कामगार असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT