Madha Flood Saam tv
महाराष्ट्र

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Pandharpur News : मुसळधार पावसाने सर्वत्र शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. यामध्ये माढा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापुराचा फटका अधिक बसला असून द्राक्ष बागा उध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या महापुरामुळे तालुक्यातील सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. मोठ्या कष्टाने आणि हिमतीने वाढवलेल्या द्राक्ष बागा डोळ्यात देखत महापुरामध्ये वाहून गेल्याने या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे

सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर मुसळधार पावसाने सीना नदीला देखील महापूर आल्याने नदीतील पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले आहे. सीना नदीला आलेल्या महापुराचा अधिक फटका माढा तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला असून तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. 

कोट्यवधींचे नुकसान 
माढा तालुक्यातील मानेगाव, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज, दारफळ, निमगाव या भागातील हजारो हेक्टर वरील द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. अजूनही द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने द्राक्षाची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

जास्तीच्या पाण्यामुळे बागांवर रोगाचा प्रादुर्भाव 

तर दुसरीकडे पानांमध्ये गाळ साचल्याने बागा वाळून गेल्या आहेत. सततचा पाऊस आणि दलदली मुळे उरल्या-सुरल्या बागांवर करपा, भुरी, डाऊनी, मूळकूज, तुडतुडे, मिलीबग या सारख्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या वाढला आहे. यंदा निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करावी; अशी मागणी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन कापसे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

SCROLL FOR NEXT