- निवडणूकांचा धुरळा उडला...
- विजयी उमेदवारांच्या कपाळाला गुलाल लागला
- गाड्यांच्या पुंगळ्या काढून कार्यकर्त्यांनी गाड्या भुंगा फाईट पळवल्या
पण या सगळ्या सेलेब्रेशनमधी भाव खाऊ गेलं पंढरपूरचं 10 वर्षाचं पोरगं
पठ्ठ्या गाडीवर चढून दंड थोपटत होता...दाढी नसली तर गालावरनं दाढी असल्यावाणी हात फिरवत होता...
वाघात भारत नाना भालकेंची झलक... तशीच गुलालानं माखलेली कापडं, दाढी वरनं फिरणारा हात अन् पैलवानावाणी थोपटलेलं दंड... ह्यो दुसरा तिसरा कोण नाही तर त्यांचाच नातू शौर्य भालके हाय... येवढ्या लहान वयात पठ्ठ्यानं दंड का थोपटलं ऐका...
वाह रं वाघा.... राजकारण करावं तर असं... टप्प्यात घावल्यावर करेक्ट केला की तू... शोभतूस तू नानाचा नातू... आज नाना असतं तर तुला खांद्यावर घेवून दाढीवरनं हात फिरवला असता... पुढं राजकारणात जायचं का शिकून मोठं व्हायचं? यावर वाघ काय म्हणतूय बघा...
खरंय राजकारणात जनताच सगळं ठरवती.... दिवंगत भारत नाना भालकेंची सून नगराध्यक्ष झाली.विरोधक गपगार झालं.. आता पंढरी नगरीचा विकास व्हावा ही अपेक्षा... म्हणजी जनता रुपी पांडूरंग आनंदी हूतू अन् विजयाचा गुलाल आपल्या भाळी पुन्हा लागतू...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.