Pandharpur News Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News: साहेब आम्हाला न्याय द्या, शाळेला रस्ता द्या...; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शरद पवारांना निवेदन

Students Letter To Sharad Pawar: पावसाळ्यात या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पवारांना रस्त्याबाबत निवेदन केले आहे.

Ruchika Jadhav

भरत नागणे

School Students:

शाळेला जाण्यासाठी रस्ता करून मिळावा या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शरद पवारांना निवेदन दिलंय. पोलीस विद्यार्थ्यांना शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नव्हते तरीही शेवटी गाडीच्या मागे पळत जावून एका विद्यार्थ्याने पवारांच्या हातात निवेदन‌ दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काल शरद पवार (Sharad Pawar) माढा तालुक्यातील कापशी येथे शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी शरद पवारांना निवेदन दिले आहे. याबाबत गावात मोठी चर्चा होतेय.

माढा तालुक्यातील टाकळी गावातील‌ काळे वस्तीचे विद्यार्थींना अनेक वर्षांपासून शाळेपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. आमदार, खासदार आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करुन शाळेकडे जाणारा रस्ता तयार केला नाही. पावसाळ्यात या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते.

या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेला आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आले आहे. तरीही शाळेच्या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. शेवटी शरद पवार येणार असल्याचे समजताच स्वतः विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

साहेब आम्हाला न्याय द्या, शाळेला रस्ता द्या...असे फलक हातात घेवून विद्यार्थी रस्त्यावर उभे होते. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या विद्यार्थ्याची भेट घेऊन तुमचा प्रश्न शरद पवार यांच्यापर्यंत पोचवतो. शाळेसाठी रस्ता तयार केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी घराकडे परत गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT