कार्तिकी यात्रा SaamTV
महाराष्ट्र

पंढरपूर : 'कार्तिकी' स वारकऱ्यांची संख्या घटली; व्यापारी चिंतेत

यंदाची कार्तिकी वारी मोठ्या संख्येने भरेल या शक्यतेने पंढरपूरची व्यापारी आनंदी होते.

भारत नागणे

पंढरपूर : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावरच संप सुरू असल्याने यात्रेवर देखील याचा परिणाम जाणवू लागला आहे. बस सेवा बंद असल्याने पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या पन्नास टक्क्यांनी घटली आहे. pandharpur kartiki ekadashi msrtc employee strike varkari

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील लाखो एसटी कर्मचारी संपावर आहेत. अजूनही संपावर तोडगा निघण्याची शक्यता नाही. त्याचा थेट परिणाम पंढरपूरच्या दोन वर्षानंतर भरणाऱ्या कार्तिक यात्रेवर दिसू लागला आहे. सन २०१९ कालावधीत झालेल्या कार्तिकी यात्रेत ८८७ बससेमधून दोन लाख २१ हजार भाविक पंढरपुरात आले होते. यातून एसटी महामंडळास सुमारे चार कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तसेच रेल्वेच्या माध्यमातून पन्नास हजार भाविक पंढरपुरात आले होते.

दोन वर्षानंतर भरणाऱ्या कार्तिकी यात्रेमध्ये एसटीची सेवा ठप्प झाल्याने पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे. याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर देखील झाला आहे. बस सेवा बंद असल्याने खाजगी प्रवासी वाहतूक मात्र सध्या जोरात सुरू आहे. परंतु पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आल्याचे सध्याचे चित्र आहे. प्रशासनाने पर्यायी खाजगी व रेल्वेची सोय केली आहे. पंढरपूरसाठी रेल्वे विभागाने सात नव्या गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून जवळपास ५० ते ६० हजार भाविक पंढरपुरात येतील अशी शक्यता रेल्वेतील अधिका-यांनी व्यक्त केली आहे. यंदाची कार्तिकी वारी मोठ्या संख्येने भरेल या शक्यतेने पंढरपूरची व्यापारी आनंदी होते मात्र आता वारकऱ्यांची संख्या घटल्याने व्यापारी देखील चिंताग्रस्त झाले आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT