Pandharpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Crime : मुलीचे लग्न मोडण्यास जबाबदार धरत हातपाय बांधून तरूणाला मारहाण; दहा लाख रुपयांची केली मागणी

Pandharpur News : आरोपीच्या मुलीचा विवाह ४ जानेवारीला होत असून या लग्नपत्रिकेत तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे प्रेषक म्हणून छापण्यात आले आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : माझ्या मुलीचे लग्न तुझ्यामुळे मोडले असा खोटा आरोप करीत एका तरूणाला हात पाय बांधून लोखंडी गज आणि काठीने   मारहाण केल्याची घटना (Pandharpur) पंढरपूर तालुक्यातील पेहे गावात घडली. इतकेच नाही तर त्याच्याकडून १० लाख रुपयांची मागणी देखील करण्यात आली. (Breaking Marathi News)

गजराज पाटील असं मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न (Marriage) मोडले आहे. त्याला दहा लाख रूपये खर्च झाले आहेत. ते दहा लाख रूपये मला दे असे म्हणत संशयित आरोपी शेखर नामदेव बेलदार, संतोष नामदेव बेलदार यांच्यासह इतर लोकांनी लोखंडी गज आणि काठीने घरात कोंडून दोरीने हातपाय बांधून बेदम (Crime News) मारहाण केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसात गुन्हा दाखल 

या प्रकरणी आरोपी विरोधात करकंब पोलिस (Police) ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या मुलीचा विवाह ४ जानेवारीला होत असून या लग्नपत्रिकेत तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे प्रेषक म्हणून छापण्यात आले आहेत. आरोपी आणि पोलिसांच्या सुमधूर संबंधाची चर्चा परिसरात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT